शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या कुलगुरू चषक टी-२० स्पर्धेतील शिवाजी विद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांच्यात रंगलेल्या उपांत्य सामन्यात गोलंदाज विश्वनाथ वरुटे याने पुण्याच्या फलंदाजास बाद केले, तो क्षण.
कोल्हापूर, दि. २१ मार्च: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत मुंबई विद्यापीठ आणि
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांनी अनुक्रमे नांदेड आणि शिवाजी विद्यापीठ यांचा
पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी, तर
नांदेड व शिवाजी विद्यापीठात तिसऱ्या क्रमांकासाठी लढत होईल.
मुंबई १६ धावांनी विजयी
आज उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मुंबई विद्यापीठाने नांदेडच्या स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा १६ धावांनी पराभव केला.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १४९ धावा केल्या. त्यात अनिल गडशी यांच्या ४५ आणि संजय पवार यांच्या २५ धावांचा समावेश होता. नांदेडच्या गोविंद सोनटक्के यांनी १२ धावांत २ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नांदेड संघ
२० षटकांत ८ बाद १३३ धावांत आटोपला. त्यांच्याकडून नरशी कागडा यांनी १९ धावा केल्या. मुंबईच्या संजय भालेराव आणि प्रवीण मुळम यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. मुंबईकडून १४ धावा आणि ३ बळी घेणारे प्रवीण मुळम सामनावीर ठरले.
रोमहर्षक सामन्यात शिवाजी विद्यापीठ ३ धावांनी
पराभूत
उपांत्य फेरीचा दुसरा सामना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात झाला. अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या रोमहर्षक सामन्यात शिवाजी विद्यापीठाला पुण्याकडून अवघ्या ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
पुणे विद्यापीठाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात
१३७ धावा केल्या. पुण्याच्या मनीष गायकवाड यांनी ५३ धावांची अर्धशतकी खेली केली,
तर नितीन प्रसाद यांनी ३६ धावा केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या सिद्धार्थ
लोखंडे यांनी ३२ धावांत ४ बळी, तर अजय आयरेकर यांनी ३१ धावांत २ बळी घेतले. विनायक शिंदे आणि विश्वनाथ वरुटे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल
खेळताना शिवाजी विद्यापीठाचा संघ २० षटकात ७ बाद १३४ धावांपर्यंत मजल मारू शकला. यामध्ये विनायक शिंदे याच्या ४१ तर विशाल हिलगे याच्या ३० धावांचा समावेश आहे. पुण्याच्या सुनिल मते व विनोद नरके यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. पुण्याकडून
अर्धशतकी खेळीसह १ बळी घेणारे मनीष गायकवाड सामनावीर ठरले.
उद्या (दि. २२) सकाळच्या सत्रात तिसऱ्या क्रमांकासाठी शिवाजी विद्यापीठ आणि
नांदेड विद्यापीठ यांच्यात सामना होईल. तर, दुपारी २ वाजता मुंबई आणि पुणे
विद्यापीठांत अंतिम सामना होईल. त्यानंतर दहा दिवस चाललेल्या या स्पर्धेचा पुरस्कार
वितरण सोहळा होईल.
No comments:
Post a Comment