शिवाजी विद्यापीठाचा युवा संसद संघ |
शिवाजी विद्यापीठात झालेल्या १६व्या राष्ट्रीय युवा संसदेमधील एक दृष्य |
शिवाजी विद्यापीठात झालेल्या १६व्या राष्ट्रीय युवा संसदेमधील एक दृष्य |
कोल्हापूर, दि.17 मार्च: सोळाव्या राष्ट्रीय युवा संसदेमध्ये देशभरातील विद्यापीठांमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अंतिम सहा संघामध्ये शिवाजी विद्यापीठाची निवड झाल्याबद्दलचे संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव ए. बी. आचार्या यांचे पत्र नुकतेच शिवाजी विद्यापीठाला प्राप्त झाले आहे, अशी माहिती विद्यापीठ युवा संसद स्पर्धेचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी आज दिली.
डॉ. माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत
16 वी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा शिवाजी विद्यापीठात 29 एप्रिल, 2022 रोजी झाली. संसदीय कार्य
मंत्रालयामार्फत समूह समन्वयक डॉ. एस. पी. सिंग, पाटणा (बिहार) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथील
डॉ.
एस.
बी.
देवसरकार यांच्या परिक्षणाखाली आणि कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
या राष्ट्रीय युवा संसदेमध्ये शपथविधी, श्रध्दांजली, नवीन मंत्र्यांची ओळख, प्रश्नोत्तराचा तास, शुन्य प्रहर, विशेषधिकाराचा भंग, राज्यसभेतील संदेश, आयत्या वेळेचे विषय, बिल (कायदा) पारित करणे इ. संसदीय कामकाजाचे मुद्दे घेण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ भारत, शेतकऱ्यांचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न, देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेचे प्रश्न, आव्हाने इ. बाबतीत अभ्यासपूर्ण चर्चा झाली. चाईल्ज मॅरेज (प्रोटेक्शन ॲक्ट) 2022 बिल पारित करण्यात आले होते. महिलांच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. सोळाव्या राष्ट्रीय युवा संसदेतील वंदना रंगलानी, आशिया जामदार, तेजस सन्मुख, प्रीती पाटील, स्नेहा मगदूम प्रज्वल माळी, सद्दाम मुजावर, श्रेया म्हापसेकर यांना उत्कृष्ट
संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत देशभरातील
विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या
स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधून सक्षम नेतृत्व विकसित होते. लोकशाहीची मूल्ये रुजविली
जातात. भारतीय संसदेचे कामकाज कसे चालते, याचे आकलन होते. कायदा पास करण्याची प्रक्रिया
समजते. यामुळे ही स्पर्धा विद्यार्थ्यांना फार उपयुक्त आहे. शिवाजी विद्यापीठाने या
स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळवणे ही अतिशय गौरवाची बाब आहे. देशभरातील
सहा संघातून प्रथम क्रमांक मिळविण्यासाठीही आपला संघ निश्चित प्रयत्न करेल, असा
विश्वासही डॉ. माने यांनी व्यक्त केला.
युवा
संसद
संघाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरुडॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.
विलास शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment