Monday 27 March 2023

‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२३’मध्ये शिवाजी विद्यापीठाचे ९२ संशोधक

डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू 


डॉ. प्रमोद पाटील, प्र-कुलगुरू


कोल्हापूर, दि. २७ मार्च: जागतिक पातळीवरील संशोधकांची क्रमवारी ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२३ नुकतीच जाहीर करण्यात आली. या जागतिक संशोधकांच्या अद्यावत क्रमवारीत शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह एकूण ९२ वैज्ञानिक, संशोधकांचा समावेश झालेला आहे.

अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठामार्फत हा निर्देशांक सन २०२१ पासून दरवर्षी जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी या यादीमध्ये स्थान प्राप्त केले आहे. सन २०२१मध्ये ४८, सन २०२२ मध्ये ८० आणि आता सन २०२३मध्ये ९२ अशा चढत्या क्रमाने विद्यापीठातील संशोधकांची या यादीमधील संख्या वाढत राहिली आहे. या वर्षीच्या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा कला, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखांकडील ८ संशोधकांना स्थान प्राप्त झाले आहे.

अमेरिकेच्या मिशीगन विद्यापीठातील प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर-डॉजर सायंटिफीक इंडेक्सतथा ए.डी. सायंटिफिक इंडेक्सविश्लेषित केलेला आहे. त्यासाठी त्यांनी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा गेल्या पाच वर्षांतील एच-इंडेक्स, आय-टेन इंडेक्स हे निर्देशांक तसेच सायटेशन स्कोअर (उद्धरणे) इत्यादी बाबींचे पृथक्करण केले. जगभरातल्या २१,४३९ शैक्षणिक संस्थांमधील १३,४५,१८६ संशोधकांचा डाटा त्यांनी संकलित केला. कृषी व वने, कला व स्थापत्य, वाणिज्य व व्यवस्थापन, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, कायदे अभ्यास, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान, नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे यांसह अन्य २५६ उपशाखांमधील संशोधकांचा समावेश या मानांकनामध्ये करण्यात आला आहे. त्यातून वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२३जाहीर करण्यात आले आहे.

अत्यंत व्यापक स्तरावर घेण्यात आलेल्या या क्रमवारीमध्ये अ++मानांकित शिवाजी विद्यापीठाच्या ९२ संशोधकांचा समावेश होणे ही महत्त्वाची बाब आहे. या संशोधकांत स्थान प्राप्त करणारे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक ठरले आहेत. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी मटेरियल सायन्स, सौरघट, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, गॅस सेन्सर आणि नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान कायम राखले आहे.

या संदर्भात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, शिवाजी विद्यापीठात विविध विषयांत अखंडित संशोधन सुरू असून त्याचे हे फलित आहे. ए.डी. सायंटिफिक इंडेक्समध्ये संशोधकांची संख्या वर्षागणिक वाढते आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील संशोधकांचे हे कार्य अभिनंदनीय आहे. महत्त्वाचे म्हणजे या यादीत यंदा प्रथमच सामाजिक विज्ञान, भाषा या विषयांतील शिक्षकांचा समावेश झाला आहे. यापुढील काळातही विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील  संशोधक आपले संशोधनकार्य जोमाने करीत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२३ मध्ये समाविष्ट शिवाजी विद्यापीठातील संशोधकांची यादी

1.      

डॉ.प्रमोद पाटील (प्र-कुलगुरू)

नॅचरल सायन्सेस/भौतिकशास्त्र

2.      

डॉ.प्रमोद पाटील (प्र-कुलगुरू)

इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी/नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी

3.         

डॉ.एस.पी.गोविंदवार

मेडीकल अँड हेल्थ सायन्सेस/बायोकेमेस्ट्री

4.         

डॉ.के. वाय. राजपुरे

टीसीओज् फॉर कॅटालायसीस/युव्ही डीटेक्टटर्स अँड सोलार सेल

5.         

डॉ.सी.एच. भोसले

नॅचरल सायन्सेस/केमिकल सायन्सेस/फोटोकॅटालायसिस/सोलार सेल्स्/फ्युअल सेल/सेमीकंडक्टर

6.         

डॉ.आण्णासाहेब मोहोळकर

इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी/एनर्जी इंजिनिअरींग/सोलार सेल्स/फोटो व्होलटॅईक सेल्स्

7.         

डॉ.ज्योती जाधव

इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी/बायोमेडीकल इंजिनिअरींग/बायोरेमेडीएशन

8.      

डॉ.के.एम.गरडकर

नॅचरल सायन्सेस्/केमिकल सायन्सेस्/फोटोकॅटालायसिस

9.      

डॉ.के.एम.गरडकर

नॅचरल सायन्सेस्/केमिकल सायन्सेस्/नॅनोमटेरियल रिसर्च लॅबोरेटरी

10.       

डॉ.संजय कोळेकर

नॅचरल सायन्सेस्/केमिकल सायन्सेस्/सुपर कॅपॅसिटर/सोलार सेल

11.       

डॉ.अनिल विठ्ठल घुले

नॅचरल सायन्सेस्/केमिकल सायन्सेस्/नॅनोटेक्नॉलॉजी/केमेस्ट्री

12.       

डॉ.एस.डी.डेळेकर

इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी/नॅनोसायन्सेस अँड नॅनोटेक्नॉलॉजी

13.       

डॉ.एन.आर. तरवाळ

नॅचरल सायन्सेस/फिजिक्स्/मटेरियल सायन्सेस्

14.       

डॉ.गोविंद बी.कोळेकर

नॅचरल सायन्सेस/केमिकल सायन्सेस/फ्लोरेसेन्स स्पेक्ट्रोस्कॉपी

15.       

डॉ.तुकाराम डी. डोंगळे

मेमरिस्टॉर/निवरोमॉर्फिक कॉम्प्युटींग

16.       

डॉ.राजेंद्र सोनकवडे

नॅचरल सायन्सेस/फिजिक्स्

17.       

डॉ.एस.आर.सावंत

इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर सायन्स्

18.      

डॉ.विजय पुरी

इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी/मेटॅलुर्जिकल अँड मटेरियलस् इंजिनिअरिंग

19.       

डॉ.डी.एम.पोरे

नॅचरल सायन्सेस/केमिकल सायन्सेस

20.       

डॉ.प्रमोद वासंबेकर

इंजिनिअरीग अँड टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींग

21.       

डॉ.राजश्री साळुंखे

नॅचरल सायन्सेस/केमिकल सायन्सेस/बायोऑरगॅनिक केमेस्ट्री

22.       

डॉ.देशमुख मधुकर बाबुराव

नॅचरल सायन्सेस /केमिकल सायन्सेस

23.       

डॉ.जॉन डिसोजा

मेडिकल ॲन्ड हेल्थ सायन्सेस/फार्मसी अँड फार्मासुटीकल सायन्सेस

24.       

डॉ.गजानन राशिनकर

सपोर्टेड आयॉनिक लिक्वीड फेज कॅटालिस्टस्

25.       

डॉ.कैलास दशरथ सोनवणे

मेडिकल ॲन्ड हेल्थ सायन्सेस/बायोकेमेस्ट्री

26.       

डॉ.टी.जी.शिंदे

नॅचरल सायन्सेस/फिजिक्स्

27.       

डॉ.मानसिंग वसंतराव टाकळे

नॅचरल सायन्सेस/फिजिक्स्

28.      

डॉ.दिलीप एच. दगडे

नॅचरल सायन्सेस/केमिकल सायन्सेस्

29.       

डॉ.एस.बी.सादळे

इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी/नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी

30.       

डॉ.पी.डी.राऊत

इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी/इन्व्हायरॉनमेंटल सायन्सेस अँड इंजिनिअरींग

31.       

डॉ.संतोष पी. नायघन

मेडिकल ॲन्ड हेल्थ सायन्सेस/फार्मसी अँड फारमासुटीकल्स् सायन्सेस

32.       

डॉ.अशोक बी गडकरी

नॅचरल सायन्सेस/फिजिक्स्

33.       

डॉ. ए. के. साहू

इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी/फुड सायन्सेस अँड इंजिनिअरींग

34.       

डॉ.राहूल सी. रणवीर

इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी/फुड सायन्सेस अँड इंजिनिअरींग

35.       

डॉ.के.डी.कुचे

नॅचरल सायन्सेस/मॅथेमॅटीकल सायन्सेस्

36.       

डॉ.निखिल गायकवाड

ॲग्रीकल्चरल ॲड फॉरेस्ट्री/प्लांट सायन्स्

37.       

डॉ.एम.व्ही.शांताकुमार

नॅचरल सायन्सेस/बायोलॉजीकल सायन्सेस

38.      

डॉ.पी.बी.दांडगे

मेडीकल अँड हेल्थ सायन्सेस्/बायोकेमेस्ट्री

39.       

डॉ.डी.टी.शिर्के (कुलगुरू)

नॅचरल सायन्सेस/मॅथेमेटीकल सायन्सेस

40.       

डॉ.दत्तात्रय गायकवाड

ॲग्रीकल्चर अन्ड फॉरेस्ट्री/प्लांट सायन्सेस

41.       

डॉ.किरण कुमार शर्मा

नॅनोसायन्स् अँड नॅनोटेक्नॉलॉजी

42.       

डॉ.निरज राणे

बायोएनर्जी/बायोरेमेडीएशन/कन्स्ट्रक्टेड वेट लॅन्डस्

43.       

डॉ.पंकज के. पवार

मेडीकल अँड हेल्थ सायन्सेस/बायोकेमेस्ट्री

44.       

डॉ.टी.व्ही.साठे

नॅचरल सायन्सेस/बायोलॉजीकल सायन्सेस

45.       

डॉ.एन.आर.प्रसाद

इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी/नॅनोसायन्सेस अँड नॅनोटेक्नॉलॉजी

46.       

डॉ.अनंत दोड्डमणी

नॅचरल सायन्सेस/केमिकल सायन्सेस

47.       

डॉ.निलम डिगे

सिन्थेटीक केमेस्ट्री/ऑरगॅनिक केमेस्ट्र

48.      

डॉ.जमिल अहमद एस.मुल्ला

मेडीकल अँड हेल्थ सायन्सेस/फार्मा अँड फार्मासुटीकल सायन्सेस्

49.       

डॉ.एस.जी.घाणे

सेकन्डरी मेटॅबॉलीटीज्/ॲन्टीकॅन्सर ॲक्टीव्हीटीज/प्लांट सायकॉलॉजी

50.       

डॉ.उत्कर्ष उत्तमराव मोरे

नॅचरल सायन्सेस/केमिकल सायन्सेस

51.       

डॉ.एन.एस.चव्हाण

ॲग्रीकल्चर अँड फॉरेस्टॲग्रीकल्चर अँड फॉरेस्ट्री/प्लांट सायन्स्

52.       

डॉ.एस.एस.कांबळे

नॅचरल सायन्सेस/बायोलॉजीकल सायन्सेस

53.       

डॉ.निरंजना चव्हाण

ॲग्रीकल्चर अँड फॉरेस्ट्री /प्लांट सायन्सेस

54.       

डॉ.सतिश एम. पाटील

नॅचरल सायन्सेस/केमिकल सायन्सेस

55

डॉ.सोनल चोंडे

इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी/मेटॅल्युरजीकल अँड मटेरियल्स् इंजिनिअरींग

56

डॉ.विजय कोरे

इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी/एन्व्हायरॉनमेंटल सायन्सेस अँड इंजिनिअरींग

57

डॉ.सुहास कदम

शिवाजी विद्यापीठ

58

डॉ.आर.व्ही.गुरव

ॲग्रीकल्चर अँड फॉरेस्ट्री/प्लांट सायन्सेस

59

डॉ.संभाजी शिंदे

ॲग्रीकल्चरल जिओग्राफी

60

डॉ.क्रांतीवीर व्ही.मोरे

नॅचरल सायन्सेस/केमिकल सायन्सेस

61

डॉ.चेतन अवरे

रिसर्च स्कॉलर

62

डॉ.एस.आर.यनकंची

प्राणीशास्त्र अधिविभाग

63

डॉ.आसिफ तांबोळी

डिएनए सिक्वेंसींग/मॉलिक्युलर सिस्टेमेटीकस्

64

डॉ.व्ही.ए.सावंत

ट्रांझीशन मेटल कॉम्प्लेक्सेस

65

डॉ.एम.एम.डोंगरे

 

66

डॉ.कबीर खराडे

आर्टिफिशयल इंटेलिजन्स्

67

डॉ.शशीभूषण बी.महाडीक

स्टॅटीस्टीकल प्रोसेस कंट्रोल

68

डॉ.सचिन पन्हाळकर

जीआयएस/रिमोट सेंसींग/वॉटरशेड मॅनेजमेंट

69

डॉ.सुरेश सुर्यवंशी

बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी

70

डॉ.प्रयोगराज फंडीलोलू

बायोकेमिस्ट्री/स्ट्रक्चरल बायोइन्फॉरमेटीक्स्

71

डॉ.जगदीश बी. संपकाळ

जिओग्राफी/जिओमॉरफॉलॉजी/रिमोट सेंसींग

72

डॉ.जयंत पाताडे

न्यूमरिकल मेथडस्

73

डॉ.एम.पी.भिलावे

टॉक्सीकोलॉजी/फिशरी सायन्स्

74

डॉ.हेमांगी व्ही. कुलकर्णी

नॅचरल सायन्सेस/मॅथेमेटीकल सायन्सेस

75

डॉ.कविता एस. ओझा

मशिन लर्निंग/ऑलगॅरिदमस्

76

डॉ.एस.एम.गायकवाड

एन्टोमॉलॉजी

77

डॉ.नितिन आनंदराव कांबळे

टॉक्सीकोलॉजी/सायकॉलॉजी

78

डॉ.मिलिंद एम सुतार

नॅचरल सायन्सेस/फिजिक्स्

79

डॉ.ए.ए.देशमुख

सेल बायोलॉजी/जिन एक्सप्रेशन

80

डॉ.एम.व्ही.वाळवेकर

सेल बायोलॉजी/गेरॉनटॉलॉजी

81

डॉ.शिवाजी एन. तायडे

इलेक्ट्रोकेमेस्ट्री/मटेरियलस् केमेस्ट्री

82

डॉ.यु.आय.बोंबले

मायक्रोस्ट्रीप ॲन्टेनाज्

83

डॉ.इरन्ना एस उडचण

फुड टेक्नॉलॉजी

84

डॉ.मेधा नानीवडेकर

स्त्री आणि समाजशास्त्र

85

डॉ.सत्यजीत एस पाटील

सुपरकॅपॅसिटर्स/सोलार सेल्स्/नॅनो मटेरियलस्

86

डॉ.प्रमोद ज्योतिराम कसबे

नॅनोबायोटेक्नॉलॉजी/बायोफिजिक्स्

87

डॉ.सागर टी. सुतार

फ्रॅक्शनल कॅलक्यूलस अँड डिफरन्शियल इक्वेशनस्

88

डॉ.एम.एस.देशमुख

ॲग्रीकल्चरल इकोनॉमिक्स्

89

डॉ.मेघा देसाई

बायोटेक्नॉलॉजी/नॅनो टेक्नॉलॉजी

90

डॉ.तृप्ती करेकट्टी

इंग्लिश लिटरेचर/ॲप्लाईड लिंग्वेस्टिक्स्

91

डॉ.पी.एस.कांबळे

इन्व्हायरॉनमेंटल ॲड रिसोर्स इकॉनॉमिक्स्/पब्लिक इकॉनॉमिक्स्

92

डॉ.तेजस पाटील

मॉलीक्युलर बायोलॉजी

93

डॉ.विनायक विठ्ठल गावडे

नॅनो मटेरियल/ग्रीन केमेस्ट्री

94

डॉ.केदार व्ही. मारुलकर

इकॉनॉमिक्स् अँड इकोनोमेट्रीक्स्/बैंकींग अँड इन्शुरन्स्

 

No comments:

Post a Comment