Friday 3 March 2023

३६व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठास तीन सुवर्णपदके, एक रौप्य

बेंगलोर येथील जैन विद्यापीठात झालेल्या ३६व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात पदक प्रदान सोहळ्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा संघ डॉ. आर.जी. कुलकर्णी व डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासमवेत.

बेंगलोर येथील जैन विद्यापीठात झालेल्या ३६व्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील रॅलीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारा शिवाजी विद्यापीठाचा संघ.


कोल्हापूर, दि. ३ मार्च: 36 वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2022-2023 जैन युनिव्हर्सिटी बेंगलोर येथे दि. 24 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत नुकताच पार पडला. सदर युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचा एकूण 35 सदस्यांचा संघ सहभागी होवून रॅली, लोकनृत्य व पाश्चिमात्य समूहगीत यामध्ये प्रथम तर लोकवाद्यवृंद प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त झाला. 

१. रॅली - प्रथम क्रमांक

२. लोकनृत्य - प्रथम क्रमांक (सहभागी विद्यार्थी – १०)

३. पश्चिमात्य समुहगीत - प्रथम क्रमांक (सहभागी विद्यार्थी – १०)

४. लोकवाद्यवृंद - तृतीय क्रमांक (सहभागी विद्यार्थी – ०९)

वरील स्पर्धेत सहभागी एकूण 25 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तसेच ०९ विद्यार्थ्यांना रौप्यपदक प्राप्त झाले. सदर युवा महोत्सवामध्ये एकूण 124 विद्यापीठांनी सहभाग घेतलेला होता. सदर सहभागी एकूण 124 विद्यापीठातून शिवाजी विद्यापीठास रॅलीसाठी प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक प्राप्त झाले तसेच लोकनृत्य “ढोलू कुनिथा”  या नृत्यास राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या एकूण 36 वर्षाच्या इतिहासामध्ये शिवाजी विद्यापीठास प्रथमच सुवर्णपदक प्राप्त झाले. 

सदर राष्ट्रीय युवा महोत्सव विद्यापीठ संघास कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के,  प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे विशेष  मार्गदर्शन लाभले. तसेच सदर संघासोबत बेंगलोर येथे युवा महोत्सव समिती सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी (मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली) व डॉ. प्रकाश गायकवाड संचालक, विद्यार्थी विकास विभाग उपस्थित होते. विद्यापीठ संघ व्यवस्थापक म्हणून श्रीमती शिला बाबासो मोहिते, मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगांव व श्री. सुरेश मोरे, वरिष्ठ सहाय्यक, विद्यार्थी विकास विभाग यांनी काम पाहिले.


No comments:

Post a Comment