Saturday 18 March 2023

महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा (दिवस सहावा):

शिवाजी विद्यापीठाच्या दोन्ही संघांसह मुंबई, नांदेडचे विजय

 

कोल्हापूर, दि.18 मार्च: येथील शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरीच्या सहाव्या दिवशी आज शिवाजी विद्यापीठाच्या दोन्ही संघांसह मुंबई व नांदेड विद्यापीठांनी विजय नोंदविले.

मुंबई विद्यापीठ 55 धावांनी विजयी

आज सकाळचा पहिला सामना मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यात झाला. मुंबईने हा सामना ५५ धावांनी जिंकला.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी 20 षटकात 6 बाद 164 धावा केल्या. त्यांच्याकडून संजय पवार यांनी 66 तर विपुल खंडारे यांनी 48 धावा केल्या. नाशिकच्या संदीप चौधरीने 2 बळी घेतले. त्यानंतर नाशिक संघाने फलंदाजी करताना २० षटकात बाद १०९ धावा केल्या. त्यामध्ये राजेंद्र शहाणेच्या 24 नंदकिशोर ठाकरेच्या 22 धावा होत्या. मुंबईच्या सुशांत घाडी यांनी 3 तर संजय पवार संजय भालेराव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मुंबईचे संजय पवार सामनावीर ठरले.

शिवाजी विद्यापीठ- संघाचा लोणेरेवर 4 गडी राखून विजय

 

सकाळचा दुसरा सामना डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेर आणि शिवाजी विद्यापीठ- संघा झाला. हा सामना शिवाजी विद्यापीठ-ब संघाने ४ गडी राखून जिंकला.

सदर सामन्यात लोणेरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी 19.3 षटकात 10 बाद 108 धावा केल्या. भरत गवंडे यांनी 58 धावा केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या दिपक कांबळेअनिल साळुंखे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ- संघाने 15 षटकात 6 बाद 114 धावा केल्या. त्या अनिल साळुंखे यांच्या 31 अभिजीत कोठावळेच्या 19 धावा होत्या.  लोणेरेच्या जितु अंधेरे यांनी 2 संतोष हसे यांनी 1 गडी बाद केला. अनिल साळुंखे सामनावीर ठरले.

शिवाजी विद्यापीठ 7 गडी राखून विजयी

 

दुपारच्या सत्रात महाराष्ट्र पशू मत्स विज्ञान विद्यापीठ, नागपूर आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यात सामना झाला. हा सामना शिवाजी विद्यापीठाने ७ गडी राखून जिंकला.

शिवाजी विद्यापीठ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना नागपूर संघाने 20 षटकात 9 बाद 118 धावा केल्या. अजित माळी यांनी 20, अविनाश जाधव यांनी 16, सतिश यादव यांनी 14 प्रशांत तेलवेकर यांनी नाबाद 14 धावा केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या विनायक शिंदे यांनी 3 तर विश्वनाथ वरूटे सिध्दार्थ लोखंडे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिवाजी विद्यापीठाने 16.4 षटकात 3 बाद 121 धावा केल्या. त्यात विनायक शिंदे यांच्या नाबाद 60 आणि प्रसाद देसाईच्या 43 धावांचा समावेश आहे. नागपूरच्या संदिप रिंधे यांनी 2 अविनाश जाधव यांनी 1 बळी घेतला. विनायक शिंदे सामनावीर ठरले.

नांदेड विद्यापीठाचा 4 गडी राखून विजय

दिवसातला अखेरचा सामना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ, नांदेड यांच्यात झाला. हा सामना नांदेडने चार गडी राखून जिंकला.

नाशिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी 20 षटकात 7 बाद 87 धावा केल्या. या संघाकडून विजय शार्दू यांनी 19 देविदास जाधवनी 14 धावा केल्या. नांदेडच्या जयराम हंबर्डे गोविंद सोनटक्के यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. नांदेडने नाशिकचे आव्हान अवघ्या 13.1 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. त्यांच्याकडून शिवाजी हंबर्डे यांनी 19 प्रकाश मोपडे यांनी 17 धावा केल्या. नाशिकच्या लक्ष्मण शेंडे यांनी 3 संदीप भागवत यांनी 2 गडी बाद केले. प्रकाश मोपडे सामनावीर ठरले.

No comments:

Post a Comment